औरंंगाबाद : स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटनखाना चालविणाऱ्या कियोरा स्पा सेंटरचा मालक प्रसाद श्रीहरी पाटील (रा. जायफळ ता. औसा जि. लातुर) याने सादर केलेला नियमीत जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. भोसले यांनी फेटाळला.
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांना लोया चेंबर्समध्ये असलेल्या कियोरा स्पा सेंटरवर प्रसाद पाटील नावाचा व्यक्ती काही मुलींना डांबुन ठेवुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हेशाखेच्या पथकाने १७ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी स्पा सेंटरवर छापा मारुन राय सोलोमन आणि झावलनेह ऑरनोराम चोरख्य या दोघा दलालांसह चार महिलांना ताब्यात घेतले होते.
छाप्यात पोलिसांनी ९४ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील मुख्य आरोपी तथा स्पा चा मालक प्रसाद पाटील हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याला १३ मे रोजी पोलिसांनी अटक केली. तर न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर त्याने नियमीत जामीनीसाठी अर्ज सादर केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हप्ते भरायला पैसे नाही; शेवटी गळफास लाऊन केली आत्महत्या!
- इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने शेअर केला धोनीसोबतचा जुना फोटो; आठवणीला दिला उजाळा
- बीडमध्ये ७०३ नवे रुग्ण तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त!
- …तर काँग्रेसला योग्य तो विचार करावाच लागेल, नितीन राऊत आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
