🕒 1 min read
मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी, शिवाजी पार्क येथे येत असतात. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे अनेकांनी घरी राहूनच भिवादन करण्याचे ठरवले. मात्र चैत्यभूमी येथे देखील अनेक अनुयायी आज आले होते. त्यातच काहींना पोलिसांनी प्रवेश न दिल्याने पोलिस आणि अनुयायांमध्ये झटापट झाली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता.
राज्य सरकारचे आवाहन आणि कोरोनाचे सावट यामुळे चैत्यभूमीवर फार कमी गर्दी झाली होती. चैत्यभूमीवर काही अनुयायांना पोलिसांनी प्रवेश नाकारला. त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. चैत्यभूमीवरील बॅरिकेड ओलांडून एका गटाने चैत्यभूमीत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर पोलीस आणि भीमसैनिकांनी गोंधळ घालणाऱ्यांना घटनास्थळावरून दूर केले.
या गोंधळानंतर रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी घडलेल्या गोंधळाच्या ठिकाणी भेट दिली. परिस्थिती नियंत्रणात असून संयम बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले. चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी काहीजण रांगेतून येण्याऐवजी थेट शिरण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
- पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्याचा भर दिवसा गोळ्या घालून खून
- भारताविरुद्धच्या पराभवावर न्यूझीलंडच्या कर्णधाराने व्यक्त केली निराशा
- मुंबई, पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून होणार सुरू
- सामनावीर ठरल्यानंतर मयंक अग्रवालने राहुल द्रविडबाबत केले मोठे भाष्य
- दमदार विजयानंतर विराट कोहलीचे मोठे वक्तव्य

