Share

पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्याचा भर दिवसा गोळ्या घालून खून

Published On: 

🕒 1 min read

पुणे: पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच आज भर दिवसा एका कॉंग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या (murder) करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth) परिसरात ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. घटना घडल्याचे समजताच विद्यापीठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेतील मृत कॉंग्रेस कार्यकर्त्याला ६ गोळ्या घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समीर मणूर (वय ४०)असं मृत व्यक्तीच नाव आहे. या घटनेची तातडीने दखल घेत विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे. भारती विद्यापीठ परिसरातील चंद्रभाग चौकात ही घटना घडली. मृत समीर चौकात उभा असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञातांनी समीरवर गोळीबार केला. अत्यंत जवळून समीर वर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळाबारात समीर गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

समीर मनूर यांची काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. आंबेगाव परिसरातील दत्तनगरमध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांच्या हस्ते त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!