🕒 1 min read
मुंबई : दादर जवळील नायगाव येथील पोलीस वसाहतीला गेल्या काही दिवसा पूर्वी घरे खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र पोलीस कुटुंबीयांनी घरं खाली करण्यास नकार दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता पोलीस बांधवांच्या कुटुंबीयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आहे. राज ठाकरे यांनी चिंता करु नका याचा आपण पाठपुरावा करु असे आश्वासन दिले आहे. नायगावमधील पोलीसांचे कुटुंबीय राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल झाले होते.
मुलांचे शिक्षण सुरु असल्याने कुटुंबियांचा घरे खाली करण्यास नकार कायम आहे. मुलांच्या शिक्षणावर याचा परिणाम होवू नये अशी भिती कुटुंबियांना सतावत आहे. याचपार्श्वभूमीवर आज ‘न्यू पोलीस कॉलनी’तील रहिवाशांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली.
इमारती धोकादायक जाहीर करण्यात आल्या असून राज्य सरकारने पोलीस बांधवांच्या कुटुंबियांना घरे खाली करण्याची नोटीस बजावली आहे. ‘आता तुम्हीच यात हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा’ अशी विनंती या रहिवाशांनी राज ठाकरे यांच्यासमोर केली. रहिवाशांची समस्या समजून घेत तुम्ही काळजी करू नका. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्न करेन. संबंधित विभागाशी चर्चा करून मार्ग काढू, असं आश्वासन राज ठाकरे यांनी पोलीस बांधवांच्या कुटुंबियांना यावेळी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा पोलिस दलाला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध- अब्दुल सत्तार
- ‘खायचं कोणाचं आणि गायचं कोणाचं? हे वागणं कौतुकास्पद पण…’; चित्रा वाघ यांचा खोचक टोला
- मराठा आरक्षणासाठी पहिलं ‘हे’ करणं गरजेचं; संभाजीराजेंचा राज्य सरकारला सल्ला
- भारतीय संघाला पहिल्या टेस्टपासून मिळेल ‘हा’ फायदा : दिनेश कार्तिक
- पंतप्रधानांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा नववा हप्ता जाहीर; 9.75 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
