Share

बेनामी संपत्तीबद्दल बोलायला लावू नका, नाहीतर…; मलिकांचा अमृता फडणवीसांना इशारा

Published On: 

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांवर केला. त्यानंतर नवाब मलिकांनी आज पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानं बनावट नोटांचा खेळ सुरु होता, १४ कोटींच्या बनावट नोटांचं प्रकरण फडणवीसांनी दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.  यावर आता ‘आपल्या जावयाची बेनामी आणि काळी संपत्ती वाचवण्यासाठी नवाब मलिक लोकांवर आरोप करत आहेत’ असं देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणल्या होत्या.

‘कुठल्याही महिलेविरोधात मला काही बोलायचं नाही. हा बेमामी संपत्तीचा विषय नाही, पण ते काढायची वेळ आली तर तीही काढू. वरळीमध्ये दोन-दोनशे कोटी रुपयांचे फ्लॅट कोणाच्या नावावर आहेत? बीकेसीमध्ये कोणी फ्लॅट घेतला आणि तिथं कोण, कोणाच्या नावावर राहतोय? हेही काढता येईल. ते काढायचं असेल तर आम्हीही तयार आहोत. ईडी, सीबीआय, एनआयए ज्या कोणाकडून माझी चौकशी करायची असेल ती करा. पण मी दिलेल्या कागदपत्रांचीही चौकशी होईल याचं आश्वासन मला द्या,’ असं आव्हान नवाब मलिक यांनी दिलं आहे.

बिगडे नवाबने पत्रकार परिषदेवर पत्रकार परिषद बोलावल्या. पण प्रत्येक वेळी खोटं आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी आम्हाला ऐकवल्या. त्यांचं एकच लक्ष्य आहे आपल्या जावयाची बेनामी आणि काळी संपत्ती वाचवण्यासाठी नवाब मलिक लोकांवर आरोप करत आहेत, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. त्यावरुन मलिकांनी अमृता फडणवीसांना इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!