Share

“एक्सिट पोलवर जाऊ नका…”- संजय राऊत 

Published On: 

मुंबई: भारतातील पाच राज्यांतील निवडणूक पार पडल्यात. काल आलेल्या एक्सिट पोलनुसार उत्तरप्रेदेश सह इतर राज्यांमध्ये जनतेने भाजपला पसंती दिल्याचे समोर येत आहे. या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राऊत म्हणाले कि, एक्सिट पोलवर जाऊ नका या आधी एक्सिट पोलचा फज्जा उडाल्याचे आपण पहिले आहे. प्रत्यक्ष मतपेटीतून काय बाहेर येतं त्याच्यावर आपण मत व्यक्त करायला हवे. मला आता देखील खात्री आहे लोकांच्या मनात राग आणि संताप आहे ते मतपेटीतून स्पष्ट होताना दिसेल.

मोदींना पत्र 

यावेळी बोलतांत राऊत असं देखील म्हणालेत कि, काही विशिष्ट लोक आमच्यावर हल्ले करतात आणि स्वतः घोटाळे करून नामा निराळे राहतात यांचे मुखवटे फाडले पाहिजेत्याचबरोबर ईडी संदर्भात मी पंतप्रधान मोदी यांच्याकडे 13 पानी पत्र दिले आहे आणि तेही पुराव्यांसह दिले आहे. त्यामुळे अनेक पत्रकारांचा आग्रह आहे कि, ते पत्र मिडिया आणि देशासमोर ठेवा. त्यामुळे आज  ते पत्र मी देणार मिडियाला देणार आहे. त्या पत्रावरून तुम्हाला कळेल की केंद्रीय तपास यंत्रणा भ्रष्टाचाराने किती पोखरली आहे. या यंत्रणा कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात आणि राजकीय विरोधकांची कोंडी करून अडचणीत आणून भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला हातभार लावतात.  हे सर्व टप्प्याटप्प्याने बाहेर येईल. आज त्यातला पहिला भाग आहे तो मी बाहेर काढतो. असेही राऊत म्हणाले.

२५ आमदार नाराज
पंचवीस किंवा त्यापेक्षा जास्त आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे, परंतु आमदाराने भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या असतील तर त्यात काही गैर आहे, असं मला काही वाटत नाही. असही राऊत यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!