Share

अनिल देशमुखांसारखे फरार होऊ नका, भातखळकरांची अजितदादांवर खोचक टीका

Published On: 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखाना तसेच निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारीची कारवाई सुरु आहे. गुरुवारी संध्याकाळी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा मारला. मुंबईतील नरिमन पॉईंटच्या कार्यालयावर छापेमारीची कारवाई झाली. अजित पवार आणि त्यांच्या 3 बहिणीच्या कारखान्यांवर सकाळपासून छापेमारीची कारवाई सुरु आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे.दरम्यान, सत्ताधारी नेहमीप्रमाणे भाजपकडून सूडबुद्धीने राजकारण सुरु असल्याचा आरोप करताना दिसून येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजपनेते हे या कारवाईचे समर्थन करताना दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे. अजित पवार, पार्थ पवार व त्यांचे नातेवाईक यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी हा 6 महिन्यांच्या संशोधनाचा परिणाम आहे, शेतक-यांवर शरद पवार बोलले त्यानमुसार ही कारवाई असे बोलणे हास्यास्पद आहे. असे त्यांनी म्हटले आहे. कर नाही त्याला डर का, जे तपासातून समोर येईल त्याला उत्तर द्या त्याचबरोबर अनिल देशमुखांसारखे फरार होऊ नका, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!