नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोपडाने अष्टपैलू रवींद्र जडेजाबद्दल एक नोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की जडेजाला कसोटी क्रिकेट मध्ये ५ व्या नंबर वर खेळवू नका? त्याच्या म्हणण्यानुसार जडेजा एक गोलंदाजी अष्टपैलू आहे त्यामुळे त्याला ५ व्या क्रमांकावर खेळवले जाऊ शकत नाही.
आकाशला त्याच्या यू-ट्यूब चानेल वर विचारण्यात आले की भारतीय संघाने जडेजाला ५ नंबरवर संधी ध्यायला हवी. जशी इंग्लंडच्या बेन स्टोक्सला खेळवण्यात आले आहे.
त्यावर तो म्हणाला की, “मला ही तसेच वाटते परंतू स्टोक्स हा फलंदाजी अष्टपैलू आहे. तर जडेजा गोलंदाजी अष्टपैलू. त्याला एकदा इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणे अगोदर ५ नंबरला संधी देण्यात आली होती. परंतु त्या नंबरवर तो फिट नाही.”
जडेजाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नाबाद १७५ धावांची खेळी केली होती. तर त्याने गोलंदाजीत ही मोठी कमाल करत ९ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या :


