पुणे : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला असून रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, गर्दी होऊ नये व त्यातून रुग्णसंख्या वाढू नये या साठी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून प्रार्थनास्थळे देखील बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, आता रुग्णांचा आलेख हा काहीसा उतरता असून येत्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊन टप्प्याटप्याने हटवण्यात येईल असे संकेत सरकारकडून दिले जात आहेत.
दरम्यान, कोरोना संसर्गामुळे मागील वर्षीपासून आषाढी वारी सह कार्तिकी, माघी आणि वारकरी संप्रदायात विशेष महत्व असलेल्या सोहळ्यांवर देखील निर्बंध लावण्यात आले असून मर्यादित स्वरूपात कार्यक्रम केले जात आहेत. दरम्यान, आता यंदाच्या वर्षी देखील कोरोनाच सावट कायम आहे.कोरोनाची दुसरी लाट खूपच घटक सिद्ध झाली असून आजही गावोगावी कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. अनेकांनी प्राण देखील गमावले आहेत. अशा परिस्थितीत पालखी सोहळ्यातील सर्वात शेवटचा मुक्काम असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीने तर चक्क संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी सोहळ्यांना पत्र लिहून पायी न येण्याची विनंती केली आहे. तर भंडीशेगाव, वेळापूर या गावांनी देखील अशीच भूमिका घेतली आहे.
आषाढी यात्रा हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक सोहळा मनाला जातो. शेकडो वर्षांपासून पालख्या आणि सोबत लाखोंचा जनसागर घेत हे सोहळे पंढरीच्या दिशेने पायी चालत येतात. हा सोहळा म्हणजे एक मोठे शहर रोज चालत पंढरीकडे येत असते. मार्गातील गावे या लाखोंच्या महासागराचे अतिशय आदराने स्वागत व सेवा करीत असतात. ही परंपरा वर्षानुवर्षे महाराष्ट्राने जपली आहे.
मात्र गेल्या वर्षी कोरोना आला आणि ही पायी वारीची परंपरा महामारीमुळे बस मधून पालख्या आणून पूर्ण करण्यात आली. गेल्या वर्षी आलेली पहिली लाट खूपच सौम्य होती मात्र यंदाची दुसरी लाट खूपच घटक सिद्ध झाली असून आजही गावोगावी कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. शेकडोंच्या प्राण गमावले आहेत. अशा परिस्थितीत पालखी सोहळा पायी आणायचा वारकरी संप्रदायाचा आग्रह असून कोरोनाचे नियम पाळून मर्यादित संख्येत पायी पालखी सोहळ्याची परवानगी देण्याची मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे.
मात्र पायी पालखी सोहळा आता पालखी मार्गावरील गावांना त्रासदायक वाटू लागला असून अजूनही कोरोनाचे संकट आ वासून उभे असताना यंदा देखील पालखी सोहळे बसने आणावेत पायी वारी नको असे ठाम मत या पालखी मार्गावरील गावागावातून पुढे येऊ लागले आहेत. पालखी सोहळ्यातील सर्वात शेवटचा मुक्काम असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीने तर चक्क संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी सोहळ्यांना पत्र लिहून पायी न येण्याची विनंती केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘जनता कोरोनाने परेशान आहे परंतु सत्ताधारी व विरोधी पक्ष हे एकमेकांना झोडण्यात मग्न आहेत’
- ‘महाविकास आघाडी असो किंवा नसो ‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असणार’
- बँकांनी शेतकऱ्यांना पिककर्ज वेळेत उपलब्ध करून द्यावे – उद्धव ठाकरे
- ‘अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास कोरोनाचे हे संकट नष्ट होईल’
- ‘तळागळातील जनतेच्या कल्याणासाठी कार्य करणे हीच गोपीनाथजींना श्रध्दांजली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

