Share

‘महाविकास आघाडी असो किंवा नसो ‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असणार’

Published On: 

खेड – गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये शीतयुद्ध सुरु असून एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. याचा प्रत्यय नुकताच खेड पंचायत समितीमध्ये पाहायला मिळाला. या ठिकाणी शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय 14 पैकी 11 जणांच्या वतीने अविश्वास ठराव दाखल केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय.

या संदर्भात आता खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. आमदार दिलीप मोहिते यांच्या कुरघोड्यांबाबत त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यामुळेच तालुक्यात आघाडीची बिघाडी झालीय असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे.

थोडीफार सत्ता आहे, म्हणून माज करू नका, शिवसेना उत्तर देईल. हा विषय त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत नेला जाईल, पण हे राजकारण घाणेरडं आहे. पंचायत समितीचा विषय आमच्यासाठी संपलाय. आम्हीही माणसं फोडू शकतो. पण आम्ही नियमांनी बांधल्यामुळे ते करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा आहे, आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर आम्ही काय करायचं ते पाहू.

पुढे बोलताना राऊत यांनी आणखी आक्रमक होत एक सिंहगर्जना देखील केली. दिलीप मोहिते यांची वागणूक अशीच असेल, तर महाविकास आघाडी असो की नसो, इथे शिवसेनेचा उमेदवार असेल आणि आताचे दिलीप मोहिते यांना पाडून शिवसेनेचे आमदार निवडून आणण्याची व्यवस्था केली जाईल, अशा इशारा देखील संजय राऊतांनी दिलाय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!