मुंबई : अनलॉक संदर्भातील घोषणा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर झालेल्या निर्माण झालेल्या गोंधळावरुन विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटवल्याची घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली आणि गुरुवारी एकच गोंधळ उडाल्यामुळे सारे निर्बंध शिथिल झाले, असे चित्र निर्माण झाले होते. पण असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिले.
या गलथान कारभारामुळे भाजपला टीकेची संधी मिळाली असून सरकारच्या कारभारावर भाजप नेत्यांनी शेलक्या शब्दात ताशेरे ओढले आहेत. या सर्व प्रकारावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी भाष्य केले असून सत्ताधारी आणि विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.
प्रश्नात लक्ष घाला हीच सर्वांची ईच्छा आहे.@TV9Marathi @zee24taasnews @abpmajhatv @News18lokmat
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) June 4, 2021
नांदगावकर म्हणाले, बस करा हि चिखलफेक… जनता कोरोनाने परेशान आहे. अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. परंतु सत्ताधारी व विरोधी पक्ष हे एकमेकांना झोडण्यात मग्न आहेत. यात कोण बरोबर आणि कोण चूक ह्यात मला पडायचे नाही. पण आता जनतेला गरज आहे ती मदतीची त्यामुळे आता “अनलॉक” करताना हि चिखलफेक थांबवून जनतेच्या प्रश्नात लक्ष घालावे हीच सर्वांची ईच्छा आहे असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार पवार यांनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावे; नारायण राणेंची मागणी
- ‘महाविकास आघाडी असो किंवा नसो ‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असणार’
- बँकांनी शेतकऱ्यांना पिककर्ज वेळेत उपलब्ध करून द्यावे – उद्धव ठाकरे
- ‘अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास कोरोनाचे हे संकट नष्ट होईल’
- ‘तळागळातील जनतेच्या कल्याणासाठी कार्य करणे हीच गोपीनाथजींना श्रध्दांजली’


