🕒 1 min read
नवी दिल्ली- केवळ देशातच नव्हे तर जगभरात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. या विषाणूमुळे सर्वच देशांची डोकेदुखी वाढली असून या विषाणूचा बंदोबस्त करण्यासाठी सर्वचजण प्रयत्न करत आहेत. लाखो लोकांचा जीव घेणाऱ्या या विषाणूचा उगम नेमका कुठे झाला याचा शोध घेतला जात असून कोरोना उत्पत्तीच्या कारणांचा देखील संशोधक शोध घेत आहेत.
याच दरम्यान काही राजकीय पक्षाचे नेते हे अजब उपाय सांगून कोरोनाला पळवून लावा असा दावा देखील करत आहेत. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी एका खासदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास नष्ट होईलअसं वादग्रस्त विधान सपा खासदाराने केलं आहे.
उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधील समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर आता त्यांच्याच पक्षाच्या अन्य एका खासदाराने अशाच पद्धतीचं विधान केलं आहे. समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. कोरोना हा काही आजार नाही. कोरोना जर आजार असता तर जगात त्यावर काहीती उपाय असता. कोरोनाचे संकट हे सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं संकट आहे. अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास हे संकट नष्ट होईल असं शफीकुर्रहमान बर्क यांनी म्हटलं आहे.
दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशमधील मुरादाबादचे समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी करोना प्रादुर्भाव आणि देशांच्या दोन्ही किनारपट्ट्यांना धडकलेल्या चक्रीवादळांसंदर्भात एक अजब वक्तव्य केलं आहे. त्यांचे हे वक्तव्य सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे.
करोना आणि चक्रीवादळांसाठी केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचं हसन यांनी म्हटलं आहे. भाजपा सरकारने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने करोना आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्ती देशामध्ये आल्याचा अजब दावा हसन यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार पवार यांनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावे; नारायण राणेंची मागणी
- ‘तुम्हीच ओबीसींचे मसिहा आहात, असे भासवू नका’, मंत्री वडेट्टीवारांचा भाजपला टोला
- ओबीसी आरक्षणासाठीच्या भाजपच्या आक्रोश आंदोलनाला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद
- शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांचा विकास करण्याचा संकल्प – जयंत पाटील
- ‘तळागळातील जनतेच्या कल्याणासाठी कार्य करणे हीच गोपीनाथजींना श्रध्दांजली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
