मुंबई : सध्या अनेक विषयांवर राजकीय नेते बेजबाबदार वक्तव्ये करत आहेत. यातून पक्षाची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तशी तंबी दिली आहे. पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर झाल्याशिवाय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संवेदनशील विषयावर बेजबाबदार वक्तवे करू नये. असे राज ठाकरे शिवतीर्थ येथे पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले.
याबाबत मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले, राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषयावर पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर झालेली नसताना पक्ष पदाधिकाऱ्यांनी त्याबाबतची आपली वैयक्तिक मतं बेजबाबदारपणे प्रसारमाध्यमांसमोर किंवा फेसबुक, ट्विटर आदी समाजमाध्यंमांवर मांडू नयेत!. असे राज ठाकरे म्हणाले.
"राजकीयदृष्टय़ा संवेदनशील विषयावर पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर झालेली नसताना पक्ष पदाधिकाऱ्यांनी त्याबाबतची आपली वैयक्तिक मतं बेजबाबदारपणे प्रसारमाध्यमांसमोर किंवा फेसबुक, ट्विटर आदी समाजमाध्यंमांवर मांडू नयेत!"
– श्री. राजसाहेब ठाकरे
(शिवतीर्थ येथे पक्ष पदाधिकाऱ्यांशी बोलताना.) pic.twitter.com/eXZz2HPshp— मनसे वृत्तांत अधिकृत (@MNSVruttant) November 20, 2021
दरम्यान काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी कलाकार सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत टीका करताना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालांचे मूके घेणारा पक्ष आहे’, असे वक्तव्ये केले होते. यावरुन मोठा वाद उद्भवला होता.
याबरोबरच भाजपाचे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे शेतकऱ्यांबाबत बेताल वक्तव्ये करताना म्हणाले होते, ‘रडायचे धंदे करू नका… सरकारनं एक लाख टन तुरी खरेदी केली… तरी रडतात साले!’ असं वक्तव्य केले होते. यावरुनही मोठा वाद उद्भवला होता. यामुळे राज ठाकरे यांनी सावधता बाळगत, पदाधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- समीर वानखेडेंच्या विवाहाचा दाखला ट्विट करत, नवाब मलिकांच्या मुलीचा नवा दावा
- भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी- बाळासाहेब थोरात
- महाविकास आघाडीचे फसवे आकडे, भाजपचाच…; चंद्रकांत पाटलांचा दावा
- …म्हणूनच मला आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते- संजय राऊत
- ‘त्या’ सेलिब्रिटींनी आता शेतकऱ्यांचं अभिनंदन करावं- सचिन सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

