Share

‘पेट्रोल पंपांवरचा मोदींचा फोटो हटवू नका, लोकांनाही समजलं पाहिजे त्यांचा खिसा कोण कापतोय’

Published On: 

मुंबई : वाढत्या इंधनदर वाढीवरुन केंद्र सरकारविरोधात अनेक आंदोलने झाली. अनेकदा निषेध व्यक्त केला गेला. सर्वसामान्य नारिकांच्या खिशाला कात्री लागणं काही थांबेना. पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने ठिकठिकाणी आंदोलने केली. सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातच आता विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘पेट्रोल पंपांवरचा मोदींचा फोटो हटवू नका, लोकांनाही समजलं पाहिजे त्यांचा खिसा कोण कापतोय, असं ट्वीट करत भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान, नरेंद्र मोदींचा देशातील अनेक पेट्रोल पंपावर फोटो आहे. वाढत्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन सर्वसामान्य नागरीक मोदी सरकारवर रोष व्यक्त करत असतात. याच पार्श्वभूमीवर भाई जगताप यांनी ट्वीट करत नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

 

दरम्यान, भ्रष्टाचार, अपुरा आणि आठ दिवसाआड पाणी पुरवठा, चुकीच्या पद्धतीने होत असलेली कामे, मोदी सरकारकडून रोजच होत आलेली पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्य तेलाचे दरवाढ, प्रचंड महागाई, कॉंग्रेस पक्षाने कोव्हिड काळात केलेली कामे हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडून शहर उत्तर मध्ये संघटना मजबूत करण्याचे आवाहन काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!