मुंबई: केंद्र सरकारने पारित केलेले तीन नवे कृषी कायद्यांमुळे शेतकरी करत असलेल्या दिल्ली सीमेजवळील आंदोलन याची गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण जगभारत चर्चा आहे. कडाक्याच्या थंडीत तग धरून बसलेले शेतकरी सरकारच्या कुठल्याही विनवण्यांना आश्वासनाला जुमानताना दिसत नाहीत. हे काळे कायदे रद्द करा याच भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सरकारकडे कायदे रद्द करण्याच्या मागण्या करत आहेत. दिल्लीच्या सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि चिल्ला या सीमांवर हे आंदोलन सुरू आहे. यात पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह अनेक राज्यांतील शेतकरी सहभागी आहेत.
शेतकरी आंदोलनावर आपले मत व्यक्त करत राऊत यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. ‘सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. सरकारने माघार घ्यावी असे आपलं म्हणणं नाही. परंतु शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यावर लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे. कारण मागच्या ६० दिवसापासून शेतकरी आंदोलन करत आहे. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि लाखो शेतकऱ्यांना घरी पाठवावे.
कितीवेळा शेतकऱ्यांशी चर्चा करणार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवायचे आहे का? शेतकरी मागे हटणार नाहीत. केंद्र सरकारला चर्चेच्या फेऱ्यांचा विक्रम करायचा आहे का?,’ असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. तसंच सीरम इन्स्टीट्युटमध्ये लागलेल्या आगीवर बोलताना हा संवेदनशील विषय असल्याचं सांगत तो कट नसून अपघात असल्याचेही ते म्हणाले.
आज शेतकरी आणि सरकारमध्ये आज अकराव्यांदा बैठक पार पडणार आहे. आज दुपारी १२ वाजता यावेळी विज्ञान भवन मध्ये शेतकरी संघटना आणि सरकार पुन्हा एकत्र येतील. मागच्या बैठकीमध्ये सरकारने शेतकर्यांना दीड वर्षासाठी कृषी कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव मानण्यास नकार दिला आहे. तर आंदोलन सुरु ठेवण्यात येणार आहे. तर कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गृह मंत्री अमित शाह यांच्याकडे देखील चर्चा केली. त्यामुळे आजच्या आकराव्या बैठकीत शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मार्ग निघणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीच्या पाठिंब्यामुळे चांगली कामगिरी करू शकलो : मोहम्मद सिराज
- महाराष्ट्राच्या इतिहासात विनायक मेटेंसारखा महाखोटारडा नेता झाला नसेल : कॉंग्रेस
- शेतकरी आंदोलन : शेतकरी आणि सरकारमध्ये आज अकराव्यांदा होणार चर्चा !
- भालचंद्र मुणगेकर यांच्या घरावर रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद काढणार निषेध मोर्चा
- मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
