मुंबई : कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. सोमवार ५ एप्रिल पासून ते ३० एप्रिल पर्यंत हे नियम लागू राहणार आहेत. राज्यात रात्री आठ ते सकाळी ७ दरम्यान संचारबंदी तर दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने मोठ्या संख्येने वाढ होत असल्यामुळे राज्याची स्थिती चिंताजनक होत असतानाच आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे काय होणार ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे.
दरम्यान याबाबत पुढील काही दिवसात निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील चार पाच दिवसात निर्णय घेतला जाईल असं बोललं जात आहे. साधारणतः बारावीच्या लेखी परीक्षा या फेब्रुवारी-मार्च दरम्यान तर दहावीच्या परीक्षा या मार्च महिन्यात होत असतात. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे या परीक्षा एप्रिल-मे मध्ये नियोजित करण्यात आल्या आहेत.
आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने परीक्षांच्या आयोजनाबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. तर, इयत्ता नववी आणि अकरावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही याबाबत उद्या निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. आज झालेल्या बैठकीत नववी आणि अकरावीच्या परीक्षा घेऊ नये असा सूर होता असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. त्यामुळे पहिली ते आठवीच्या प्रमाणेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना देखील प्रमोट केली जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- रोहित शेट्टीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; ‘सूर्यवंशी’चं प्रदर्शन पुन्हा ढकललं पुढे
- ‘माझे प्राण माझीच जबाबदारी’ या भूमिकेत नागरिकांनाच शिरावे लागेल’
- ‘बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी ; खेळाडूंसाठी बायो-बबल तयार’
- ‘या’ बँकेवरील निर्बंध आरबीआयकडून मागे; ग्राहकांना मोठा दिलासा
- कौतुकास्पद : ‘या’ शेतकऱ्याने केले वर्षभर फळ देणारे आंब्याचे वाण विकसित


