मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये काल पुन्हा एकदा टाळेबंदी व उपाययोजनांवर चर्चा झाली आहे. काल ( ५ एप्रिल ) राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी टाळेबंदी, निर्बंध व उपाययोजना ह्या मुद्द्यांवर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली याची माहिती दिली आहे.
कोरोनाला अटकाव करण्यासाठीचे उपाय, शाळा-कॉलेज बंद असूनही पूर्ण फी आकारणी, लसीकरण या मुद्द्यांपासून ते पत्रकारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत विचारलेल्या प्रश्नांपर्यंत आपली भूमिका मांडली आहे. गेल्या दोन महिन्यात महाविकास आघाडी सरकारमधील २ मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे, यामुळे भाजप सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहे का ? असा सवाल माध्यमाच्या प्रतिनिधीने राज ठाकरे यांना केला.
यानंतर राज ठाकरेंनी दिलेल्या उत्तरामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे. जर कोणी सरकार पाडायचा प्रयत्न करत असेल तर मंत्र्यांचा देखील त्यात दोष आहे, असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. सरकार उगीच पाडले जात नाही, मंत्र्यांची कृत्ये देखील तशीच आहेत. ती काय इमारत आहे का खालचे पिल्लर काढायला. त्या मंत्र्यांकडून असं काही तरी घडतंय म्हणून त्यांना राजीनामे द्यावे लागत आहेत.’ असं भाष्य राज ठाकरे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘घनश्याम तू लेखक म्हणून बिकावू तर आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस, तुला आम्ही चोप देणार’
- दहावी-बारावीच्या परीक्षा होणार ? शिक्षणमंत्री गायकवाड यांची बैठक संपली
- ‘बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी ; खेळाडूंसाठी बायो-बबल तयार’
- ‘या’ बँकेवरील निर्बंध आरबीआयकडून मागे; ग्राहकांना मोठा दिलासा
- कौतुकास्पद : ‘या’ शेतकऱ्याने केले वर्षभर फळ देणारे आंब्याचे वाण विकसित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

