Share

‘घनश्याम तू लेखक म्हणून बिकावू तर आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस, तुला आम्ही चोप देणार’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लेखक घनश्याम पाटील यांनी त्यांच्या ब्लॉग मधून काही आरोप केले आहेत. ’जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट मला करायची आहे’ अशा शीर्षका खाली त्यांनी एक ब्लॉग लिहला. या लिखाणामुळे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त केली जात आहे.

पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घनश्याम पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

रुपाली ठोंबरे यांची फेसबुक पोस्ट :-
स्वतःला लेखक म्हणणाऱ्या या बिकावू ,
स्वतःच स्टेलमेंट करून लेख लिहणाऱ्या लेखक म्हणाऱ्याचा तीव्र धिक्कार निषेध, घनश्याम तू लेखक म्हणून बिकावू तर आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस आमच्या पक्ष अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे बद्दल लिहायला तू एक सेटलमेंटचा पुरावा दे की तुला कायदेशीर कारवाई तर करणार पण बिकावू लेखक म्हणून मनसे चोप पण देणार अरे लेखक आहेस ना तू वास्तव्याचे प्रश्न समजत नसतील तर कसला आला रे लेखक प्रसिद्धीसाठी कोणीही भुरटे लोक उठतात आणि स्वतःला लेखक म्हणून मानसिक रुग्णा सारखे लिहतात घनश्याम तुझ्या माहितीसाठी कृष्णकुंज वर न्यायासाठी लोक येतात कारण लोकांची आणि आमची विश्वासाची स्टेलमेंट झाली आहे हे लक्षात ठेव आणि तूच काढ पक्ष आणि चालवून दाखव आमच्या साहेबांबद्दल लिहताना जरा वास्तव्याचे खरी परिस्थिती लिहिण्याचे धैर्यतुझ्या सारख्या स्वतःला लेखक म्हणाऱ्याकडे नाही असो तू लेखक म्हणून छपरी आहेसच पण माणूस म्हणून तू बिकावू ,मानसिक रुग्ण आहेस. आम्ही मनसे वास्तव्य आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जनतेच्या हिताचे राजकारण करणारा पक्ष आहे
उगीच नाही लोक प्रश्न घेऊन मा. राज साहेबांकडे येत जय महाराष्ट्र माझ्या बहिणींनो भावांनो नुसते वाचू नका या घनश्यामला त्याची जागा दाखवून देऊ की लेखक म्हणून तू छपरी ,बिकावू आहेस.

अशा आशयाची पोस्ट रुपाली ठोंबरे यांनी लिहून त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!