मुंबई: राज्यात आंदोलने, हिंसाचार, कारवाया आणि राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप हेच प्रकार सर्वत्र बघायला मिळत आहेत. एसटी कामगारांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. त्यांच्या आंदोलनावर अद्यापही काही तोडगा काढण्यात ठाकरे सरकारला यश आले नाही. या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारला चांगलेच वेठीस धरले आहे. त्याच सोबत अमरावती सारख्या ठिकाणी हिंसाचार घडला. तिथे संचारबंदी देखील लागू करण्यात आली. आता तिथली परिस्थिति आटोक्यात आली असली तरी देखील भाजप पक्ष त्या मुद्द्याला धरून बसली आहे. या सर्व घटनांवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज भाष्य केलं आहे.
महाराष्ट्र हा दंगलीसाठी ओळखला जाऊ नये. हे कायद्याचं राज्य आहे. विदर्भात पुढे २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. कायदा सर्वांना समान आहे. अमरावतीत काय घडलं ते कुणी केलं ते देशाला माहिती आहे. त्याच सोबत गृहमंत्री आणि आमरावतीच्या जनतेला देखील माहीत आहे हे कृत्य कोणी घडवलं, असं म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर हल्ला केला आहे. त्याच सोबत ठाकरे सरकार पक्ष किंवा गट बघून कुठल्याही कारवाया करत नाही, असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
अमरावतीमध्ये झालेल्या हिंसचाराबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, इंटेलिजन्स फेल होतं, ती देखील माणसं आहेत. काश्मीरमध्ये देखील फेल झालंय त्याच पद्धतीने त्रिपुरा आणि अमरावतीमध्ये सुद्धा फेल झालं. मात्र राज्य सरकारने अमरावतीमधील परिस्थिती आटोक्यात आणली आहे. आज अमरावती शांततेत नांदत आहे. भाजप कशासाठी आंदोलन करतंय त्यांना पुन्हा अमरावती पेटवायची आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ठाकरे सरकार कारवाई करताना गट, पक्ष पाहत नाही – संजय राऊत
- ‘अर्जुन खोतकर, रुपाली नांगरे पाटील यांचा कारखाना घोटाळा’, किरीट सोमय्यांचा आरोप
- रझा अकादमवीवर तुमच्या काळात बंदी का नाही? राऊतांचा फडणवीसांना सवाल
- रझा अकादमी भाजपाची बी टीम आहे तर…- देवेंद्र फडणवीस
- ‘उद्या हे लोक सुपारी, बडीशोपलाही चरस-गांजा ठरवून मोकळे होतील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

