Share

रझा अकादमी भाजपाची बी टीम आहे तर…- देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : त्रिपुराच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात काही भागात पडले होते. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) हे काल(२१ नोव्हें.) अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी अमरावतीमध्ये हिंसाचार झालेल्या भागाची फडणवीसांनी पाहणी केली. तसेच या दौऱ्यात त्यांनी दंगलग्रस्त भागाला भेट दिली.

तद्पश्चात फडणवीसांनी पत्रकार परिषदेमध्ये रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात बोलत असतांना ते म्हणाले की,’रझा अकादमी ही काँग्रेसच्या काळातच पोलिसांवर हल्ले का करते? यापूर्वीही मुंबईमध्ये अशा प्रकारची दंगल आणि पोलिसांना मारण्याचे काम रझा अकादमीच्या मोर्चामध्येच का झाले होते. तेव्हाही काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे ही कोणाची बी टीम आहे हे सगळ्यांना माहिती आहे. रझा अकादमीवाल्यांसोबत कोणाचे फोटो आहेत हे देखील तपासले पाहिजे. आशिष शेलारांचे(Ashish Shelar) फोटो तुम्ही दाखवले पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakray) यांचे दाखवले का? काँग्रेसच्या सगळ्या मंत्र्यांचा दाखवला का? त्यामुळे समजा त्यांचे मत आहे की रझा अकादमी भाजपाची बी टीम आहे तर मग मी आज मागणी करतो त्यांच्यावर बंदी घाला. काँग्रेसमध्ये हिम्मत नाही. कारण ते कोणाचे पिल्लू आहे हे सगळ्यांना माहिती आहे’, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’१२ नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये मोर्चा निघाला. या मोर्चाला काय विचार करुन परवानगी देण्यात आली याचीही चौकशी झाली पाहिजे. या मोर्चाच्या नंतर समाजकंटकांनी ज्याप्रकारे दुकाने आणि लोकांना लक्ष्य केले. यातून दंगल घडवायची होती म्हणून एका विशिष्ट समाजाच्या आणि धर्माच्या दुकानांवर हल्ला करण्यात आला. त्यातून अमरावतीची परिस्थिती बिघडली.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!