कर्नाटक : गेले ५ महिने कोरोनाने देशभरात कहर घातला असून, संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. उद्योग, व्यवसायांसह शैक्षणिक क्षेत्रामध्ये आता अनियमितता आली असून सर्व शैक्षणिक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रत्येक राज्य प्रयत्न करत आहे.
परिक्षांच हंगाम असलेल्या मार्च ते जून काळातच कोरोनाचा प्रभाव अधिक राहिल्याने सर्व प्रकारच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता अनलॉक-४ अंतर्गत देशातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. जेईई-नीट सारख्या प्रवेश परीक्षा देशभरात सद्या सुरु असून राज्यातील विविध प्रवेश परीक्षा देखील येत्या काही महिन्यात घेतल्या जाणार आहेत.
अखेर पत्रकाराच्या मृत्यूनंतर राजकीय नेत्यांना जाग; “या” नेत्यांची पुण्यात महत्वाची बैठक
कर्नाटक राज्यात या महिन्यातच पूर्व विद्यापीठ प्रमाणपत्र परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षा ७ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत होणार असून विद्यार्थ्यांना दळणवळणाच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये, म्हणून विशेष काळजी कर्नाटक सरकारने घेतली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा काळात परीक्षा प्रवेश पत्र दाखवल्या नंतर मोफत बससेवा दिली जाईल अशी घोषणा कर्नाटक सरकारच्या परिवहन विभागाने केली आहे.
भाजपने मला अटक करायचा खेळ रचला असला तरी मी माझ्या वक्तव्यावर ठामच : प्रताप सरनाईक


