पुणे : गेले पाच महिने राज्यभरात कोरोनाने हाहाकार घातला आहे. पुण्यातील जनजीवन एकबाजूला सुरळीत होत असतानाच कोरोनाच्या थैमानाचे व प्रशासनाचे व्यवस्थेचे वाभाडे निघालेले दिसून येत आहेत. सद्या, अनेक जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड्स उपलब्ध नाहीत.
आरोग्य व्यवस्थेच्या गलथान कारभारामुळे अनेकांचे जीव जात असून २ दिवसांपूर्वी पत्रकार पांडुरंग रायकर व पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचा देखील प्रशासनाच्या समन्वयाअभावी बळी गेला. त्यामुळे नागरिकांच्या मनात संतापाची भावना असून राज्यभरात सर्व व्यवस्था असल्याचे दावे करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दाव्यांवर प्रश्न उभे केले गेले.
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख अखेर शिवसेनेत सक्रीय!
यानंतर आता राजकीय नेत्यांना जाग आल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे सर्व आज पुणे दौऱ्यावर असून शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील. यासर्व नेत्यांसह सर्व आमदार, खासदार, पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त, वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, महापौर यांच्या सोबत आज दुपारी दीड वाजता बैठक होणार असल्याचे समजते.
त्यांना बुडाखाली आग लागल्यावर ‘मराठी अस्मिता’ आठवते


