Share

भाजपने मला अटक करायचा खेळ रचला असला तरी मी माझ्या वक्तव्यावर ठामच : प्रताप सरनाईक

Published On: 

मुंबई: अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणी सातत्याने भाष्य करत असलेली अभिनेत्री कंगना रानौत मुंबईत आली तर आमच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला होता.

यानंतर आता भाजपने महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचा आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. तर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी, तयार आहे असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख अखेर शिवसेनेत सक्रीय!

सरनाईक यांनी, “मी माझ्या विधानावर ठाम आहे.  संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही. तसेच भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे.” अशी भूमिका ट्विट द्वारे त्यांनी स्पष्ट केली आहे.

त्यांना बुडाखाली आग लागल्यावर ‘मराठी अस्मिता’ आठवते

काय आहे? हे प्रकरण

अभिनेत्री कंगना रणौत हिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिसांवरच संशय घेत आरोप केले. तर, “मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते अशा आशयाचे ट्विट केले होते. दरम्यान, मला मुंबईत न येण्याची धमकी दिली जात आहे. मुंबईत असुरक्षित वाटत असून मुंबई आता पाकव्याप्त काश्मिरसारखी झाली आहे,” असे ट्विट अभिनेत्री कंगनाने केल्यानंतर आता तिला चांगलेच लक्ष्य केले जात आहे.

शिवसेना मुद्दाम ‘त्या’ प्रसिद्धीच्या जाळयात अडकत आहे ; मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप

दरम्यान प्रताप सरनाईक यांनी, “कंगना मुंबईत आली तर आमच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडतील, उद्योजक व सेलिब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करणार आहे,” असा टोकाचा इशारा दिला होता.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!