Share

“आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करुन महाराष्ट्राला ‘नाईट क्लब’ बनवायचं का”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. विधिमंडळात विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या भाजपा नेत्यांनी विविध मुद्द्यावरुन विधिमंडळात गदारोळ घातला. त्यानंतर विधिमंडळाबाहेर आंदोलन करुन घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane)यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना पाहून ‘म्याव म्याव’ असा आवाज काढला. यामुळे उपस्थितात एकच हशा पिकला.

आंदोलनानंतर नितेश राणे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, विरोधी पक्ष म्हणून आम्हाला घोषणा देण्याचा अधिकार आहे. आम्हाला ज्या घोषणा योग्य वाटतात त्या आम्ही देणार. ज्या पक्षाला जी घोषणा लागू होते तीच घोषणा आम्ही देणार. आता वाघाची मांजर झाल्यामुळे आम्ही म्याव म्यावच म्हणणार. वाघाची डरकाळी देण्याचे दिवस गेले.

आदित्य ठाकरेंकडे चार्ज का दिला नाही, या प्रश्नाला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, त्यांना चार्ज देऊन या महाराष्ट्राला काय टाळं लावायचंय का? महाराष्ट्राला नाईट क्लब बनवायचं का? रश्मी ठाकरेंना चार्ज देणार आहे, आसं पण ऐकलयं आम्ही, नेमंक काय होणार ही भूमिका तरी आम्हाला कळाली पाहिजे. महाराष्ट्राला ताटकाळत का ठेवलयं हे आम्हाला कळत नाहीये, असे नितेश राणे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!