Share

तुम्हाला असामान्य परिस्थिती निर्माण करायची आहे का? संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना आक्रमक सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये या मुद्द्यावरून आमने-सामने आले आहेत. याच प्रश्नी काही दिवसांपूर्वी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची शिष्टमंडळासह भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केंद्राकडे काही मागण्या केल्या असून सर्व सविस्तर माहिती यावेळी राष्ट्रपतींना देण्यात आली.

यानंतर आज(बुधवार) संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारण आक्रमक टीका केली आहे. 16 जूनला कोल्हापुरात मूक आंदोलन झालं. सर्व राज्यकर्ते, आमदार, खासदार यांनी जबाबदारी पाळली. आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनंती केली आणि चर्चेला बोलावलं. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. आरक्षण सोडून जे प्रश्न आहेत ते 15 दिवसात सोडवू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 2 महिने होऊन गेले तरी सरकार काहीही करत नाही, अशा शब्दांत संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली.

यासोबतच, ‘नांदेडला जे मूक आंदोलन झालं ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यातून लोकांच्या भावना दिसून आल्या. मुख्यमंत्र्यांनी जे पत्र दिलं. त्याचं उत्तर मी आज देत आहे. त्यांना मेल केलेला आहे आणि इथेही आणलेलं आहे. रिव्ह्यू पिटीशन दाखल केलेली आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. भोसले समितीचा अहवाल प्राप्त झाला पण पुढे काय? पुढचा ऍक्शन प्लॅन काय? हे काही ठरलेलं नाही. मला सरकारला प्रांजळपणे सांगायचं आहे. तुम्हाला असामान्य परिस्थिती निर्माण करायची आहे का? रिव्ह्यू पिटीशनचा निकाल आल्यावरच पुढची दिशा ठरवणार का?,’ असे सवाल उपस्थित करत संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!