बीड : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायलयाने रद्द केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच आता ओबीसींसाठी राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी भाजपाने आज चक्का जाम आंदोलन केले.
परळीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यापूर्वी प्रीतम मुंडे यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. चक्काजाम नंतर राज्य सरकारने ओबीसी अरक्षणा संदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन तीव्र असेल असा इशारा खासदार प्रीतम मुंडे यांनी दिला आहे.
यावेळी प्रीतम यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता सवाल विचारला. त्या म्हणाल्या, ‘ओबीसींच्या आरक्षण प्रश्नासाठी मंत्रिपदाला लाथ मारण्याचा दम महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील एकातरी मंत्र्यांत आहे का?. तसेच, सगळंच जर केंद्राकडून मागायचं असेल राज्य चालवायला माणूसही मागून घ्या, असा खोचक टोलाही त्यांनी ठाकरे सरकारला लगावला.
‘महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आणि ओबीसीचे आरक्षण रद्द झाले. कोरोनातील कुठल्या ही प्रश्नासंदर्भात केंद्र सरकार काहीच देत नाही, असे म्हणत आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. केंद्राने हे केले नाही, ते केले नाही. केंद्राकडून सगळं मागायचं असेल तर राज्य चालवायला केंद्राकडून माणूस मागून घ्या, भाजपमध्ये मध्ये खूप खमके माणस आहेत. राज्य चांगल्या पद्धतीने चालू शकतात, असा टोला प्रीतम मुंडे यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजपचे आजचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा’ ; कॉंग्रेसचा घणाघात
- जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार! औरंगाबादकरांच्या समस्यांमध्ये होणार वाढ
- ‘रोल मॉडेल‘ म्हणून पुढे येताना तरुणांनी आचरण उत्तम ठेवावे; राज्यपाल कोश्यारींचे आवाहन
- सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर ; सोमवारपासून नागपुरात नवे निर्बंध
- ‘राऊत चावी फिरविली तेवढेच सांगतात, नंतर भलतेच बोलतात’, रावसाहेब दानवेंचा टोला


