मराठा तरुणांनी ४ वर्षे संयम दाखवला आहे. संयमाने मूक मोर्चे काढून जगासमोर आदर्श घालून दिला आहे. आत्ता त्यांच्या संयमाची परीक्षा घेवू नका… त्यांचा अंत बघू नका… या तरुणांनी वेगळी वाट चोखाळली तर तरुणांना दोष देवू नका असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला दिला. सरकारने मराठा समाजाला कसे फसवले आहे आणि फसवत आहे याची माहिती मुंडे यांनी दिली.
मराठा समाजाने राज्यात आत्तापर्यंत लाखोंच्या संख्येने ५७ मोर्चे काढले आहेत. परळी येथे मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरु असून आषाढी एकादशीच्यादिवशी आंदोलन केले जाणार आहे. मराठा आरक्षणा संदर्भात राज्यात 57 मुक मोर्चे निघूनही निर्णय झाला नाही. आता हे मोर्चे तालुक्या तालुक्यात निघत आहेत. मूक मोर्चे झाले आता ठोक मोर्चे निघत आहेत. समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका , मराठा आरक्षण निर्णय तातडीने घ्या अशी मागणी त्यांनी केली.
काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या
- मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
- मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
- राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
- आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
- मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
- अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

