Share

बिबट्याबाबत कसल्याही प्रकारे अफवा पसरवू नका; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

Published On: 

सोलापूर : करमाळा तालुक्यात अधिवास असणाऱ्या बिबट्याबाबत नागरीकांनी काळजी घ्यावी. तसेच बिबट्याबाबत कसल्याही प्रकारे अफवा पसरवू नये, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशिय सभागृहात जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक झाल. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. व्यासपीठावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आदी उपस्थित होते.

याबैठकी नंतर त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना हे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, नरभक्षक बिबट्यास ठार मारण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार वनविभागाकडून बिबट्यास जेरबंद करण्याची त्याचबरोबर ठार मारण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.वनविभागाच्या पथकांना यामध्ये लवकरच यश मिळेल. वनविभागाच्या अंदाजानुसार तीन ते चार बिबट्या असण्याची शक्यता आहे.सिद्धरामेश्वर यात्रेबाबत अहवाल राज्यशासनाकडे पाठविला जाईल. त्यानंतर यात्रेबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे ही त्यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात येत आहे. मात्र दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व विभागांनी सतर्कता बाळगावी , अशा सूचनाही  भरणे यांनी दिल्या.बैठकीस अधिष्ठात डॉ.संजीव ठाकूर, अधीक्षक अभियंता संतोष शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख,महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे, अतिरिक्त शक्यचिकित्सक मोहन शेगर आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!