🕒 1 min read
मुंबई : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, देशाचं संरक्षणमंत्री पद, कृषीमंत्रीपद अशी अनेक महत्त्वाची पदं सांभाळली आहे. सध्या शरद पवार हे राज्यसभा खासदार आहेत. महाराष्ट्रात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगामध्ये त्यांनी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार म्हणजेच शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी यांची मूठ बांधण्यात आली. आज शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. 80 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधानांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य लाभो, दीर्घआयुषी व्हावा, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहे.
दरम्यान, पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून खास शुभेच्छा देण्यात आल्यात. मात्र शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना, काँग्रेसला मात्र चिमटे काढण्यात आलेत. शरद पवार म्हणजे हत्तीची चाल आणि वजिराचा रूबाब असलेले नेतृत्व आहे. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कमजोर झाले आहे. अशावेळी शरद देशातील मोठ्या वर्गास आकर्षित करत आहेत, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गांधी कुटुंबाने काँग्रेस सोडावी, तर मोदी, शाह, नड्डा सेल्फमेड नेते’
- सरकारचा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडबाबत नवा ‘फतवा’
- “कुणीही येतंय चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा”; ममता बॅनर्जींची भाजपावर तुफानी टीका
- ‘त्या’ खासदारांचा काय अभ्यास? भुजबळांचा उदयनराजेंना अप्रत्यक्ष टोला
- अंबानी-अदानींचे टोल नाके बंद पाडणार; शेतकऱ्यांचा उद्यापासून हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

