🕒 1 min read
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांचे संबंध थेट अंडरवर्ल्डशी असल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे यासंदर्भात फडणवीसांनी कागदोपत्री पुरावे देखील सादर केले आहेत. नवाब मलिक यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शहावली खान या गुन्हेगारासोबत जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबईच्या एलबीएस रोडवरील २.८ एकर जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडे होती. त्यांच्याकडून ही साडेतीन कोटींची जागा नवाब मलिक तेव्हा सक्रिय असलेली कंपनी सॉलिडस कंपनीने खरेदी केली, असा दावाही त्यांनी केलाय.
यानंतर मलिक यांनी फडणवीस यांनी केलेले आरोप मान्य केले असल्याचा दावा भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आता या प्रकरणात स्वत:च एफआयआर दाखल करावा आणि चौकशी करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मलिक यांच्यावर टीका केली.
ठाकरे सरकारचे कपडे कसे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले आहेत हे फडणवीस यांनी उघड केलेत. फडणवीस यांनी केलेले आरोप मलिक यांनी मान्य केलेत. दीडपट कमी किंमतीत जागा मिळवली हे नवाब यांनी कबूल केलेय. आम्हाला २५ रु. स्क्वेअर फूट मध्ये जमीन घ्यावी लागली असे ते सांगत आहेत. संपूर्ण इमारत भाड्याने कमी किंमतीत कशी मिळते, नवाब मलिक सामान्य जनतेला मूर्ख समजतात का, असा सवालही शेलार यांनी केला
तसेच अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध झाकण्यासाठी चांडाळचौकटी काम करत असून मुंबई १९९३ बॉम्ब प्रकरणी आरोपीसोबत मलिक यांचे संबंध आहेत. राज्याचे मंत्री आरोपांची कबुली देत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: एफआयर दाखल करून चौकशी करावी अशी मागणी शेलार यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांना आमच्याविरोधात माहिती देणारे कच्चे खेळाडू- नवाब मलिक
- ‘माझ्या मंत्रिमंडळातील कोणत्याच मंत्र्यांला हिंदी कळत नाही’, मुख्यमंत्र्यांचे अमित शहांना पत्र
- ‘पप्पांना मृत्यू आधीच दिसला होता का?’ आर.आर.पाटलांच्या मुलीची भावूक पोस्ट
- ‘सत्तेसाठी अंडरवर्ल्डची मदत घेणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची इतिहासात नोंद होईल’
- अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग; फडणवीसांनी दिले पुरावे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

