Share

 दुखणे अंगावर काढू नका, वेळीच उपचार घ्या – डॉ.मंगेश गोंदावले

Published On: 

औरंगाबाद : शहराच्या तुलनेत आता ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. मृत्यूदरही ग्रामीण मध्ये वाढला आहे. उपचारांसाठीचे नियम पाळले जात नाहीत. लोक दुखणे अंगावर काढतात वेळेत उपचार घेत नाही. त्यामुळे काही प्रमाणात अडचणी आहेत. योग्य वेळी उपचार मिळण्यासाठी दुखणे अंगावर काढू नका.

यासाठी ग्रामीण भागात आता अंगणवाडीसेविका, आशाताई, एनआरएचएम आणि ग्रामदक्षता समितीच्या माध्यमातून काम करण्यावर भर दिला जात आहे. अशी माहिती जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी दिली.

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे. मागील वर्षी शहरात रुग्ण संख्या वाढत होती. परंतु यंदा मात्र मार्च नंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. एप्रिल महिन्या अखेरपासून बाधितांची संख्या कमी होतांना दिसत असली तरी मृयू होणाऱ्यांचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही.

याचे कारण ही इपॅडमिक प्रोसेस अपेक्षित होतीच. ट्रीटमेंटचे प्रोटोकॉल योग्य आहे का? याचा देखील विचार होणे आवश्यक आहे. अनेकजण आजही दुखणेे अंगावर काढतात. उशीरा उपचार घेतात. टेस्ट करत नाही. यामुळे देखील बाधितांची संख्या आणि मृत्यूदर वाढतो.तेंव्हा योग्य वेळी उपचार घ्यावेत, कोरोनाची तपासणी करुन घ्यावी यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत असल्याचेही डॉ.गोंदावले यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!