Share

मुसलमान फक्त निवडणुकीच्या वेळीच आठवतात का ? खा. जलीलांचा सवाल

Published On: 

औरंगाबाद : राज्यसरकारला मुसलमान फक्त निवडणुकीच्या वेळीच आठवतात का ? असा थेट सवाल औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. खासदार जलील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत होते. तसेच हा प्रश्न मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारतोय असा घणाघात देखील केला.

यावेळी बोलताना खासदार जलील म्हणाले, न्यायालयाने मुस्लिमांना ५ टक्के आरक्षणाची गरज असल्याचे सांगितले आहे. मग तरी तुम्ही त्यासाठी का पुढाकार घेत नाही ? असा सवाल जलील यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणावर, ओबीसी आरक्षणावर संसदेत तुम्ही चर्चा करता, त्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे याचे आम्ही पण समर्थन करतो पण मुस्लिमांना देखील आरक्षणाची गरज आहे असे जलील यांनी सांगितले. संसदेत चर्चा करून त्यावर निर्णय घेणे हे खूप सोपे काम आहे तरी पण तुम्ही त्याकडे का लक्स देत नाही अशी सवाल जलील यांनी उपस्थित केला.

शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या करोडी येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा खेलो इंडिया स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची घोषणा केली. त्यामुळे औरंगाबादेतील क्रीडा विद्यापीठाच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!