🕒 1 min read
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून आज(२८ डिसें.)हे अधिवेशन संपणार आहे. दरम्यान, आजच्या शेवटच्या दिवसाचे औचित्य साधून भाजप नेते प्रविण दरेकर यांनी महिला व बालकांवरील अत्याचारा संबंधी भाष्य केले आहे.
यासंदर्भात प्रविण दरेकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून ते म्हणाले आहेत की,’आज राज्यात महिला अधिकारी, महिला खेळाडू ही सुरक्षित नाही. राज्यात रोज कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. महिलांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालू, अशी वल्गना करणार्या सरकारने काय केले? बालकांवरील अत्याचाराचे व महिलांवरील गुन्ह्यासंबंधीच्या तपासातील डीएनए नमुने आजही प्रलंबित आहेत’, असे दरेकर म्हणाले.
आज राज्यात महिला अधिकारी, महिला खेळाडू ही सुरक्षित नाही. राज्यात रोज कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. महिलांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालू, अशी वल्गना करणार्या सरकारने काय केले?(1/3) pic.twitter.com/dJCQRZXsqw
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 28, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’पोलिसांकडून फॉरेंसिक लॅबकडे डीएनए नमुने पाठविले गेले पण फॉरेंसिक लॅबमध्ये पदे रिक्त असल्यामुळे शेकडो नमुन्यांचे अहवालच मिळत नाही. मग तपास कसा होणार?’, असा सवालही यावेळी दरेकरांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल त्याला…’
- ज्या पक्षाने देशात लोकशाही प्रस्थापित केली त्याचे आम्ही वारस आहोत- राहुल गांधी
- राज्यपालांच्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये- संजय राऊत
- ‘…यामुळे सापसुद्धा चावतो ही आधीच माहीत असलेली गोष्ट नव्याने समजली’
- ‘संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना?’, रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

