मुंबई : आज मंगळवार, दि.4 ऑक्टोबर 2022 रोजी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण सहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
या मंत्रिमंडळ बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधाला. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून १ कोटी ६२ लाख रेशनकार्ड धारकांना म्हणजे ७ कोटी लोकांना दिवाळीच पॅकेज देणार आहे. यामध्ये रवा, चणाडाळ, साखर आणि तेल या चार वस्तूंचं पॅकेट आम्ही देणार आहोत. आमच्या सरकारने हे दिवाळीच गिफ्ट या सर्व सात कोटी लोकांपर्यत पोहचवण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे नेमका हा निर्णय
दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ४८६ कोटी ९४ लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली. सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Viral Video | सायकलवर बसून केले शास्त्रीय नृत्य, मुलीचा डान्स बघून व्हाल थक्क!
- Supriya Sule | “सत्याचा अखेर विजय झाला आहे”; देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
- Eknath Shinde | दसरा मेळाव्याला येणाऱ्या शिवसैनिकांसाठी शिंदे गटाने दिली ‘इतके’ लाख फूड पॅकेट्सची ऑर्डर
- Anil Deshmukh | अनिल देशमुखांना जामीन मंजूर पण तुरुंगातून सुटका नाही! जाणून घ्या काय आहे प्रकरण?
- Cabinet meeting । “शिधापत्रिकाधारकांना दिवाळी भेट, पोलिसांना घरबांधणीसाठी कर्ज”; मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे ६ निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

