🕒 1 min read
औरंगाबाद : बालगोपाळांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांचा आवडता दिवाळी सण जवळ येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत आहे. कोरोना कमी झाला असला तरीही गेल्या काही दिवसातील रुग्णांचा अभ्यास केला असता गर्दीतून संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र शहरातील बाजारांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आहे. अजूनही कोरोना संपलेला नाही. असे असतानाही विना मास्क नागरिकांची संख्या जास्त दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून उसळलेल्या गर्दीत नागरी मित्र पथक हरवले की काय? अशी चर्चा रंगत आहे.
दसरा संपला की दिवाळीचे वेध सुरू होतात. आणि सगळेच दिवाळी सण जल्लोषात साजरा करण्यासाठी तयारी करण्यास सुरुवात करतात. दिव्यांचा आणि चैतन्याचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या निमित्ताने सोने-चांदी, कापड, इलेक्ट्रॉनिक अशा विविध खरेदीसाठी नागरिकांची गेल्या काही दिवसांपासून मोठी लगबग सुरू आहे. त्यात सुट्टी असल्याने शनिवार-रविवार बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. दिवाळसण एक दिवसावर येऊन ठेपलेल्या असताना बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आहे. गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट, सिटी चौक, रंगारगल्ली, कुंभारवाडा तसेच शहर परिसरातील बाजारपेठ, मॉलमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळली आहे.
मात्र याच गर्दीतून कोरोनाचाही फैलाव होऊ शकतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रवास, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने आवश्यक मास्क परिधान करणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतराच्या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे. मात्र बहुतांशी गर्दी ही विनामास्क आढळून येत आहे. शहरात लसींची संख्या असतांना लसीकरणही पूर्ण झालेले नाही. असे असतांना नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात केलेले मनपाचे नागरी मित्र पथकही गायब असल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत’
- तेजश्रीने लेटेस्ट फोटो शेअर करताच चाहत्यांच वेधले लक्ष
- संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला ‘हा’ लाखमोलाचा सल्ला
- आरोप-प्रत्यारोपाच्या धुराळ्यात अमृता फडणवीसांनी लक्ष्मीमातेला घातले ‘हे’ साकडे
- ‘महागाई शिगेला पोहोचली आहे, मोदी सरकारकडे जनतेसाठी…’, राहुल गांधींनी व्यक्त केली खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
