Share

‘जिल्हा आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वयाने काम करा’

Published On: 

मुंबई : मागील महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने ह्या आठवड्यात चांगलाच जोर लावलेला पाहायला मिळत आहे. काल रात्रीपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यासह भिंत, इमारत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. तीन दुर्घटनांमध्ये २० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये तब्बल २०० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे दरड कोसळणे, अनेक भागांमध्ये पाणी तुंबणे अशा घटना घडल्या आहेत. चेंबूर आणि विक्रोळी परिसरात पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या.

या दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहे, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबई शहर आणि राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वयाने काम करावे.

नागरिकांनीही सुरक्षितताविषयक नियम आणि संदेशांचे पालन करुन काळजी घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस किंवा नजिकच्या शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!