Share

अमोल कोल्हे राणा भीमदेवी थाटात बोलले असतील पण…; संजय राऊतांनी कोल्हेंचे कान टोचले

Published On: 

मुंबई : अभिनेते आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये त्यांना शिरूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील होते. कोल्हेंनी सेनेच्या आढळराव पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला.

२०१९ विधानभ निवडणुकांनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राज्यात सत्ता स्थापन केली. राज्यातील सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले असले तरी स्थानिक पातळीवर मतभेद आणि वाद असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. ज्या पक्षांच्या विरोधात नेत्यांना-कार्यकर्त्यांना लढावं लागलं, तेच पक्ष एकत्र आल्याने कटुता अद्यापही कायम असल्याचं वारंवार समोर आलं आहे. दरम्यान, असाच वाद खेडसह शिरूरमध्ये देखील सुरु असल्याचं पाहायला मिळतं.

आता पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरुन या दोघांमधील श्रेयवाद हा चांगलाच तापला आहे. नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र त्यापूर्वीच म्हणजे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हे उद्घाटन उरकून टाकलं. यामुळे हा वाद चर्चेत आला असून काल अमोल कोल्हे यांनी आढळराव-पाटील यांना रोखठोक उत्तर दिलं आहे.

‘मुख्यमंत्री हे मुख्यमंत्रीपदावर आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे,’ असं विधान अमोल कोल्हे यांनी काल कार्यक्रमात बोलताना केलं होतं. त्याला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना कोल्हेंचे कान टोचले आहेत.

‘पवार हे वयाने, अनुभवाने मोठे नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद सरकारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ते मान्य केलं आहे. अमोल कोल्हे राणा भीमदेवी थाटात बोलले असतील. पण हे तीन पक्षांचे सरकार आहे,’ असं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!