🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे- अहमदनगर जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहे. या बँकेचा मी संचालक होण्याच्या अगोदर बँकेच्या नफ्यातून पुर्वी कारखान्यांना कर्ज वाटप व्हायचे.
परंतु मी बँकेचा संचालक झाल्यानंतर या सर्व गोष्टींना विरोध केला व शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायासाठी कर्ज देण्याचे काम केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सुखा समाधानाचे दिवस आले. तसेच दुग्धोत्पादन वाढले. त्यामुळे ह्या बँकेच्या माध्यमातून जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे, असे मत भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केले आहे.
नगर तालुक्यातील रतडगाव, देवगाव, आगडगाव आदी गावांतील शेतकऱ्यांना कर्जाच्या धनादेशांचे वाटप झाले. आगडगाव येथील कार्यक्रम प्रसंगी मा.आ.कर्डीले बोलत होते.
माजी आमदार कर्डिले पुढे म्हणाले की, इतर जिल्ह्यातील जिल्हा बॅंकेच्या तुलनेत अहमदनगर जिल्हा बॅंक अत्यंत चांगले काम करत आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. कारखान्यांना इतर अनेक मार्गाने कर्ज उपलब्ध होत असते. परंतु गोरगरीब शेतकऱ्यांना केवळ जिल्हा बॅंक हीच आधार ठरली आहे.
त्यामुळेच आजपर्यंत आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसा आधार मिळेल, यासाठी प्रयत्न केला आहे. आशिया खंडात सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेली ही बॅंक शेतकऱ्यांचा तारणहार ठरली आहे. सध्या अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना या कर्जरुपाने दीपावलीची भेट मिळत आहे, असे कर्डीले म्हणाले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, माजी सभापती विलास शिंदे, सरपंच मच्छिंद्र कराळे, माजी सरपंच यशवंत पालवे, शिवाजी कराळे, विक्रम पालवे, पोपट कराळे, रामदास कराळे, परसराम कराळे तसेच बॅंकेचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
- बेजबाबदार मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिरसह ३८ जण कोर्टात
- गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास का होतोय ?
- धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित,टोपेंची कबुली
- जाणून घ्या राज्यात कोरोना रुग्णांची पाच अंकी संख्या घटून झाली चार अंकी झाली का ?
- महिलांवरील अत्याचार रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी- मोनिका राजळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
