🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील १४ खासगी रूग्णालयांनी कोरोना उपचारासाठी वैद्यकीय देयकांमध्ये ४४ लाख ७७ हजार १३१ रूपये इतकी ज्यादा रक्कमेची आकारणी केल्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या द्वारा संबंधित रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती खराब झालेली आणि त्यातच खासगी रुग्णालयांच्या लुटीमुळे रुग्ण परेशान झाले आहेत.
खासगी रूग्णालयांनी शासन दराने कोरोना उपचार करणे बंधनकारक आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाचे धोरण, वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, मार्गदर्शक सुचनांनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येत असलेली देयके ही अवाजवी आकारली जाऊ नये म्हणून सदर देयकांची तपासणी करणे करता औरंगाबाद शहरात जिल्हाधिकारी यांच्या लेखी आदेशान्वये लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सदर लेखापरीक्षकांनी रुग्णालयांना दैनंदिन भेटी देऊन वेळोवेळी लेखापरीक्षणाचे काम केलेले आहे. २३ सप्टेंबर, २०२० ते १ मे २०२१ या कालावधीमध्ये नमूद रुग्णालयांनी शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा ज्यादा दराची आकारणी करून रुग्णांकडून वैद्यकीय बिलामध्ये जास्तीची रक्कम वसूल केल्या बाबत लेखापरीक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अहवाल सादर केलेला आहे. तसेच जिल्ह्यामध्ये विविध माध्यमे दूरचित्रवाणी, वृत्तपत्रे तसेच नागरिकांकडून वैद्यकीय देयकांच्या अवाजवी आकारणीबाबत तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त होत आहेत.
त्या अनुषंगाने सदर रुग्णालयांना जादाची आकारणी केलेली रक्कम रुग्णांना परत करणेबाबत प्राथमिक कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. हि रक्कम रुग्णालयांनी रुग्णास परत न केल्यास या रुग्णालया विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९८७ खंड २, ३, ४ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र शासनाकडील दिनांक ३० ऑगस्ट, २०२० अधिसूचने मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे कारणे दाखवा नोटीसमध्ये नमूद केले आहे.
या रुग्णालयांचे नाव समाविष्ट
हेडगेवार , धूत, सुमनांजली, आशिष, धनवई अँड सिंग, मेडिकव्हर, सनशाईन, ऑरिअन सिटी केअर, ईश्वर हॉस्पिटल, ग्लोबल, एशियन सिटी केअर, अजंठा, वायएसके, कृष्णा हॉस्पिटल.
महत्त्वाच्या बातम्या
- मृतदेहाची अदला-बदली होतेय, तरी गांभीर्य नाही, अतुल सावे यांची राज्य सरकारवर टीका
- ‘यामुळेच’ होतेय लसीकरण केंद्रावर गर्दी, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होऊ शकतो कोरोनाचा वेगाने प्रसार!
- केंद्रीय मंत्री बंगालमध्ये येऊन दंगली भडकवत आहेत; ममतादीदींचा गंभीर आरोप
- सोलापूर : रमजान ईदनिमित्त नियोजित कडक संचारबंदी शिथिल करण्याची मागणी
- ‘रेमडेसीवीरबाबतीत गैरप्रकार, बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्याचे आढळल्यास अशा रुग्णालयांवर कारवाई करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
