Share

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात आता सर्व पक्षीय नेत्यांचा अध्याय

Published On: 

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकरिता आता नव्याने सर्व पक्षियांनी जाेरदार उडी मारली आहे. अंदाजे २० ते २५ वर्षांपासून माजी मंत्री तथा काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर, माजी आमदार रामप्रसाद बाेर्डीकर यांच्याकडे आलटून पालटून अध्यक्षपद हाेते. यातच आता दाेन्ही दिग्गज राजकारण्यांची पुढची पिढीही सरसावली आहे. यात सुरेश वरपूडकर यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समशेर वरपूडकर, रामप्रसाद बाेर्डीकर यांची कन्या भाजप आमदार मेघना बाेर्डीकर – साकाेरे या देखील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत आपले वजन आजमावत आहेत.

सर्व पक्षीय नेत्यांनी बँकेच्या निवडणूकीमध्ये रस घेणे सुरु केले आहे. पुढील काळात साधारणत: ३ ते ४ वर्षात काेणतीही निवडणूक नाही. आता महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्याने पुन्हा भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्थानिक निवडणूकांमध्ये भाजपला फारसे यश मिळत नव्हते अशीच परिस्थिती अत्तापर्यंत इथे पहावयास मिळली. त्यामुळे आता शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपला कसरत करावी लागू शकते.

आता जुन्या जाणत्या नेत्यांची पुढची पिढी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत उसरल्याने संचालक मंडळासह बँकेच्या अध्यक्षांची निवडणूकीत चूरस निर्माण हाेणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार सुरेश देशमुख, आमदार मेघना बोर्डीकर – साकाेरे, बँकेचे संचालक अॅड. स्वराजसिंह परिहार, उपमहापौर भगवान वाघमारे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा बँकेच्या शेतकी भवनात भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी सकाळी आपल्या समर्थकांसह अर्ज दाखल केला. दुपारी पावणे तीन वाजता आमदार वरपुडकर, माजी आमदार देशमुख, अॅड. परिहार, वाघमारे यांनी अर्ज दाखल केला. दरम्यान, ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर यांच्या स्नुषा रूपाली गोरेगावकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!