परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रतिस्पर्धी दोन्ही पॅनलव्दारे शेतकरी हित, बँकेच्या सबलीकरणासह अन्य विषयांच्या अनुषंगाने एका ओळीचासुध्दा वचननामा किंवा जाहीरनामा प्रसिध्द केलेला नाही. रविवारी संचालक पदासाठी मतदान होणार आहे. तसेच मंगळवारी निकाल घोषीत करण्यात येणार आहे.
परंतु दोघाही प्रतिस्पर्धी पॅनलने शेतकरी हितासह अन्य कोणतेही विषय चर्चेस आणले नाही. या दोन्ही पॅनलने त्या प्रश्नांच्या अनुषंगाने एकाओळीचासुध्दा जाहीरनामा, वचननामा वगैरे प्रकाशित केला नाही. त्याबाबत या दोन्ही पॅनलने हेतुतः या माध्यमातून व्यक्त होण्यास टाळाटाळ केली. वास्तविकता दोन्ही पॅनलच्या दृष्टीने या गोष्टी अडचणीच्या ठरणार्या आहेत. कारण दोन्ही पॅनलअंतर्गत नेतृत्वासह बहुतांशी उमेदवार बँकेचे विद्यमान संचालक आहेत. या मंडळींनी बँकेच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत वादग्रस्त कारभाराबाबत ओळीने आक्षेप घेतला नाही, की हरकत घेतली नाही.
उलट दोन्हीही पॅनलचे मातब्बर नेते व अन्य संचालक हे सदैव मौनी व सोयीची भूमीका बजावत राहिले. त्यातील काहींनी बँक म्हणजे कुरणच हे ओळखून तेथून पध्दतशीरपणे काय काय लाटता येईल, याच गोष्टींचा विचार केला. त्या दृष्टीनेच अंमलबजावणी केली. त्यामुळेच या दोन्ही पॅनलच्या नेतृत्वासह बहुतांशी संचालकांमंडळींना बँकेअंतर्गत अनागोंदी व गैरप्रकारावर बोलण्याचा हक्क नाही. त्यामुळेच ते लाजतबूजत का असेना या निवडणुकीत त्या वादग्रस्त विषयांपासून कोसोदूर राहिले आहेत. परिणामी, या निवडणुकीत बँकेअंतर्गत कोट्यावधी रुपयांचे गैरप्रकार, अनागोंदीबाबत ओळीनेसुध्दा प्रचारयुध्दात उच्चार झाला नाही.जिल्हा बँकेच्या एका रोजंदारीवरिल कर्मचार्यास बँक प्रशासनाव्दारे पदोन्नती बहाल केली. ती एवढी, की तो रोजंदारीवरील कर्मचारी आज बँकेत व्यवस्थापक म्हणून आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शहरात येताय, सावधान! ‘स्वॅब’से करेंगे सबका स्वागत
- प्राचार्य डॉ. शरद अदवंत यांचे निधन, शैक्षणीक-सामाजिक क्षेत्राची मोठी हानी
- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लॉकडाउनमध्येही धावणार स्मार्ट सिटी बस
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

