पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना 29 मार्च रोजी पोटदुखीनंतर ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर पित्ताशयामध्ये समस्या उघडकीस आली. त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला 31 मार्च रोजी ऑपरेशनसाठी वेळ दिला होता, परंतु मंगळवारी पोटदुखी सुरु झाल्याने त्यांना निर्धारित ऑपरेशनच्या एक दिवस आधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याच सांगण्यात आल आहे.
या दरम्यान पवार यांच्या प्रकृती विषयी सर्व स्तरातून विचारपूस करण्यात येत आहे. तसेच समाजातील प्रत्येक घटकांतून त्यांच्याप्रती काळजीचे सूर बाहेर पडत आहेत. त्यांना लवकरात लावाके बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या जाता आहेत. मात्र या दरम्यान काही विकृतांनी सोशल मीडियावर हीन दर्जाच्या पोस्ट्स केल्या आहेत. ज्यामध्ये ‘काहींनी तर शरद पवार यांच्या मृत्यूची आशा करत आपली विकृती समाजासमोर ठेवली.’ असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला आहे.
यावर राष्ट्रवादीकडून सायबर क्राईम विभागाकडे अशा युजर्सविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती शेख यांनी दिली असून यापुढे शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यावर, कार्यकर्त्यावर मर्यादा सोडून टीका केली तर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आयपीएल आधी मुंबई, चेन्नई आणि दिल्लीच्या संघांना मोठे धक्के
- दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची झाली निवड, अजिंक्य, पृथ्वी शॉ स्पर्धेतून बाहेर
- ‘लोकांनी बेदरकारपणा थांबवला नाही तर कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय नाही’
- ना तुम जानो ना हम… दोन्ही संघांना टार्गेटच नाही कळलं
- शाब्बास लातूरकर! ९८ हजार जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

