Share

‘बैजु बावरा’ चित्रपटात ‘या’ कारणामुळे दीपिका दिसणार नसल्याची चर्चा

Published On: 

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण असल्यास तो सिनेमा हीट होणार हे मानले जाते. दीपिकाने याआधी ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ सारखे हीट चित्रपट भन्साळी यांच्यासोबत केले आहे. या दोघांनी एकत्र केलेले हे  सिनेमे हीट झाले आहेत. आता पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी आणि दीपिका ‘बैजू बावरा’ या नव्या चित्रपटातून एकत्र येणार असल्याची चर्चा होती . मात्र आता या चित्रपटामध्ये  दीपिका पादुकोण नसणार अशी चर्चा होत आहे.

गेले काही दिवस संजय लीला भन्साळी हे त्यांचे जुने प्रोजेक्ट ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘हिरा मंडी’ यामध्ये व्यस्त होते. आता पुन्हा एकदा भन्साळी या नव्या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. आता भन्साळींचा दीपिकासोबत एक मेगा प्रोजेक्ट असणार आहे. यात दीपिका एका राणीची भूमिका साकरणार आहे.
‘बैजू बावरा’ या चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच भन्साळींना दीपिकाला या भूमिकेसाठी निवडणार होते. मात्रता दीपिकाला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याचे समजते आहे. हे  एकूण चाहते आवक झाले आहेत. रणवीर सिंगला देण्यात येणाऱ्या मानधनाइतकेच मानधन आपल्याला मिळायला हवे या मुद्दय़ावरून निर्मात्यांनी तिला बाहेरचा रस्ता दाखविला आहे असे एका वेब पोर्टलनं दिलेल्या माहितीवरून समजत आहे. परंतु याबाबत निर्मात्यांकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

संजय लिला भन्साळी यांच्या आगामी महत्वकांक्षी ‘बैजु बावरा’ या चित्रपटात सुरुवातीला रणबीर कपुरला विचारण्यात आले होते. मात्र त्याने नकार दिल्याने या चित्रपटात कार्तिक आर्यनची वर्णी लागली होती. अशी चर्चा सुरु आहे. मात्र रणबीर कपुरने दिलेल्या नकारानंतर संजय लिला भन्साळी यांनी रणवीर सिंगचा या भूमिकेसाठी विचार केला आहे. मात्र यावर अद्यापही ठाम निर्णय झालेला नाही. मात्र रणवीर सिंगने गेल्या काही वर्षात भन्साळीसोबत बाजीराव मस्तानी, पद्मावत, रामलीला यासारख्या चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे दिपवीर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार म्हणून चाहते देखील खुश होते. मात्र आता त्यांच्या या आनंदवर विरजन आले म्हणावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!