Share

पुणेकरांवर लादलेले निर्बंध लवकरच मागे घेतले जाणार? आरोग्यमंत्री आणि मुख्य सचिवांमध्ये चर्चा

Published On: 

पुणे : राज्य शासनाने नुकतीच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ‘ब्रेक द चेन’ची नवीन नियमावली जाहीर केली. त्यामध्ये पुणे जिल्ह्यासह १४ जिल्ह्यांमध्ये स्तर तीनचे नियम कायम ठेवले आहे. पण मुंबईतील दुकाने, कार्यालये आठवड्यातील सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंतची परावनगी दिली आहे. आता यावरूनच भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या विरोधात पुण्यात चांगलीच नाराजी पसरली असल्याचं पाहून आता राज्य सरकारला देखील आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करण्याची वेळ आली आहे. कारण पुणेकरांच्या नाराजीची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आलेली असून आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव यांच्यामध्ये पुण्याच्या निर्बंधावरुन चर्चा सुरु आहे. पुणे महापालिकने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविल्यास पुण्याचे निर्बंध मागे घेतले जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना लवकरच दिलासा मिळू शकतो.

दरम्यान, हे निर्बंध लादल्यामुळे पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईसह 14 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले. मात्र पॉझिटिव्हीटी रेट 5% खाली नोंदवला गेला असतानाही पुण्यात निर्बंध जैसे थे ठेवण्यात आले. राज्य शासनाची भूमिका पुणेकरांवर अन्याय करणारी आहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्री साहेब, पुण्याबद्दल इतका आकस का? एकीकडे मुंबई चे निर्बंधात शिथिलता आणून तिथे व्यापारी व दुकानदारांना सूट दिली आहे मात्र पुण्याचे निर्बंध जैसे थे ! पुण्याचा पोसिटीव्ह रेट 4% पेक्षा कमी असून देखील पुण्याबाबत दुजाभाव का? असा सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान, पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी 4 टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? सलग महिनाभर पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली असून या पार्श्वभूमीवरच पालकमंत्री कोरोना आढावा बैठकीत निर्बंधातील शिथिलतेबाबत मागणी करत आलो आहे. महापौर म्हणून मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून याबाबत राज्य सरकारने न्याय देण्याच्या भूमिकेत राहावे असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!