Share

मार्चपूर्वीच निदेशकांना रखडलेल्या नियुक्त्या मिळणार : राज्यमंत्री बच्चू कडू

Published On: 

🕒 1 min read

जालना : शाळेतील पटसंख्येच्या नियमानुसार आरटीई कायद्यांतर्गत आहे अशा शाळेत कला, क्रीडा, कार्यानुभव निदेशकांची नियुक्त्या रखडल्या होत्या. या संदर्भात ‘महाराष्ट्र देशा’ने दोन दिवसांपूर्वी वृत्त प्रासारित केले होते. या वृत्ताची दखल राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे. राज्यातील निदेशकांच्या प्रलंबित नियुक्त्या मार्च सुरू होण्यापूर्वी त्या निकाली काढू, असे मंत्री बच्चू कडू यांनी आश्वासन दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत तो बोलत होते. बैठकीत निदेशकांच्या ड्यूटीकरिता मसुदा तयार करण्यात येत असून हे काम अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच आदेश निर्गमित करून त्याप्रकारे निकाली काढू, असे मंत्री बच्चू कडू म्हणाले.

प्रहार कला, कार्यानुभव व क्रीडा संघटनेचे राज्यसंपर्क प्रमुख संतोष राजगुरू यांच्या नेतृत्वात शालेय शिक्षण व क्रिडा विभाग राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या दालनामध्ये बैठक झाली. या बैठकीत राज्यात अनेक वर्षापासून कला, कार्यानुभव व क्रीडा शिक्षक यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत. सध्या शैक्षणिक सत्र सुरू झाले असून वर्ग सहावी ते आठवी करिता अध्यापन सुरू झाले आहे. पण तरीही सहावी ते आठवी या वर्गासाठी कला, कार्यानुभव व क्रीडा या विषयासाठी अध्यापन करणाऱ्या निदेशकांना मात्र अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाहीत.

तेव्हा अंशकालीन तसेच अतिथी निदेशक यांना कार्यरत शाळेवर कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी, नियुक्ती देताना २०११ ते २०१९ या काळात शाळेवर निदेशक म्हणूनकर्तव्य बजावलेल्या सर्व शिक्षकांना नियुक्ती देण्यात यावी, नियुक्ती करताना पूर्वी सेवा केलेल्याना विनाअट नियुक्ती दयावी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निदेशकांनाअर्धवेळ वेतनश्रेणी देण्याचे नियोजन व्हावे, केरळ पॅटर्न प्रमाणे दोन किंवा तीन शाळा एकत्रित करून निदेशक नियुक्ती बाबत विचार करण्यात यावा,आदी विषयावर चर्चाकरण्यात आली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!