मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन गेले कित्येक महिने सुरु आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात एसटी कर्मचारी संतप्त झाले असून आज एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न एडवोकेट सदावर्ते यांनी आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी पवारांचे निवासस्थान गाठले आहे.
काही आंदोलकांनी बंगल्याच्या आत जाण्याचा प्रयत्नही केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आहेत. त्यामुळे आता हे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन नवीन वळण घेणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.
यावर आंदोलनावर दिलीप वळसे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, “एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. सांविधानिक मार्गाने तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत. तसेच आंदोलनाला अनिष्ट वळण देऊन कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये”, असे बोलत आंदोलकांना नम्र आवाहन देखील केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर पंकजा मुंडेंची प्रितिक्रिया; म्हणाल्या…
“कामगारांच्या ज्वालामुखीचा उद्रेक”; भातखळकरांची प्रतिक्रिया
सुप्रिया सुळेंनी एसटी कर्मचारी आंदोलकांपुढे जोडले हात!
IPL 2022: चेन्नई संघात मराठी भाषेचा बोलबाला; प्रॅक्टिस सेशन व्हिडीओतील गायकवाड – सोळंकीचे संभाषण व्हायरल!
शरद पवारांच्या निवासस्थानी एस.टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन; सिल्वर ओकवर फेकल्या चप्पला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

