🕒 1 min read
नवी दिल्ली-हाथरस प्रकरणामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हाथरस येथील युवतीवर झालेला बलात्कार आणि तिच्या अमानुष हत्येचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून आज सर्व राज्यांमध्ये जिल्हापातळीवर सत्याग्रह करणार आहे.
एका बाजूला योगी सरकारवर टीका होत आहे तर दुसऱ्या बाजूला मुंबई पोलिसांवर निशाणा साधणारी अभिनेत्री कंगना राणावत या प्रकरणात गप्प का असा सवाल उपस्थित होत होता. अखेर कंगनाने आपले मौन सोडले असून तिने या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मला योगी आदित्यनाथ यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. जसं प्रियांका रेड्डीच्या प्रकरणातील दोषींना ज्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला त्या ठिकाणी मारण्यात आलं त्याच प्रमाणं हाथरसच्या पीडितेलाही न्याय मिळायला हवा, असं कंगणाने म्हटलं आहे.
I have immense faith in @myogiadityanath ji, just how Priyanka Reddy rapists were shot dead on the very spot they raped and burnt her alive we want the same emotional, instinctive and impulsive justice for #HathrasHorror #HathrasHorrorShocksIndia
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 30, 2020
दरम्यान, हाथरस येथील दलित महिलेवर झालेला सामूहिक बलात्कार आणि तिच्या मृत्यूचे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने हाताळले, त्याबद्दल त्यांची पदावरून हकालपट्टी करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही मागणी केली आहे.
तर दुसऱ्या बाजूला हाथसर बलात्कार प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने केला जाऊ शकतो. तसेच त्या पीडितेच्या कुटूंबाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या राज्याकडे सोपवावा अशी मागणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
दरम्यान, बसपा प्रमुख मायावती यांनी योगींना एक सल्ला दिला आहे. बसपाच्या नेत्या मायावती यांनी हाथरस प्रकरणात सरकारच्या भूमिकेसंदर्भात ट्विट केलं आहे. हाथरसमध्ये माध्यमांसोबतही गैरवर्तन करण्यात आलं. काल, परवा विरोधी पक्षांचे नेते व लोकांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार.. हे सगळं अतिशय निषेधार्ह व लज्जास्पद आहे. सरकारला ही अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलण्याचा सल्ला आहे. नाहीतर यामुळे लोकशाहीची मूळच कुमकूवत होतील,” असा सल्ला मायावती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- …तर मी भाजपात प्रवेश करेन,बच्चू कडू यांनी दिले थेट मोदींना आव्हान
- राज्यात कोविड संदर्भात तब्बल 2 लाख 75 हजार गुन्हे; 29 कोटी 66 लाख रुपयांची दंड आकारणी
- हाथसर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न युपी सरकारच्या वतीने केला जाऊ शकतो : ठाकूर
- हाथरस प्रकरण : मायावतींनी योगी सरकारला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
- लोकजनशक्ती पार्टी संस्थापक रामविलास पासवान यांची प्रकृती आणखी खालावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
