🕒 1 min read
मुंबई: चिपी विमानतळाच्या श्रेयवादावरून भाजप- सेनेत वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत ९ ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार असल्याचे जाहीर केले.तर मुख्यमंत्री ठाकरेंची उपस्थिती गरजेची नसल्याचेही त्यांनी म्हटले. यावरूनच शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी राणेंवर निशाना साधला आहे.
राणे आणि त्यांची मुली वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. कधी म्हणतात मुख्यमंत्र्यांची गरज नाही. तर कधी म्हणतात मुख्यमंत्र्यांचा तिसरा चौथा क्रमांक लागतो. कधी म्हणतात शिवसेनेत येड्यांचा बाजार आहे. मात्र नारायण राणेंनी सांगावे की, त्यांनी सिंधुदुर्ग मध्ये काय विकास केला. त्यांनी याठिकाणी जनआशीर्वाद यात्रा केली. मात्र त्यांनी येथीलच कळणीमळणी या गावात ते का गेले नाहीत ? असा सवाल करत त्यांनी त्या ठिकाणी त्यांना शिव्यांची लाखोळी मिळणार होती हे माहिती होते. गेली १४ वर्षे ते कुठे होते? असा सवाल करत त्यांनी राणेंना चांगलाच टोला लगावला आहे. त्यामुळे त्यांना बेताल वक्तव्यांसाठीच त्यांना केंद्रीय मंत्री केले आहे काय? असा सवाल मनीषा कायंदे यांनी केला आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोकणात खूप कामे केली आहेत. त्यामुळे कोकणात शिवसेनेने विकास केला आहे. नारायण राणेंनी उगाच बेताल वक्तव्ये करू नयेत. आमचे खासदार, आमदार प्रोटोकोल प्रमाणे तिकडे जातात. आमचे सामान्य कार्यकर्ते आमदार झालेत. वैभव नाईक यांनी राणेंना हरवले. यापलीकडे काय बोलावे, त्यामुळे राणेंनी आता बेताल वक्तव्ये करणे बंद करावे. असा सल्लाही मनीषा कायंदे यांनी राणेंना दिला आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरे चिपी विमातळ उद्घाटनाला वाजत गाजतच येणार, हिंमत असेल तर रोखून दाखवा. असा इशाराही त्यांनी राणेंना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या रूटच्या सर्व लाईन व्यस्त आहेत…औरंगाबादेत अग्निशमन विभाग ‘ऑन कॉल’!
- ‘लोकांचा आक्रोश मी पाहिलाय, त्यांना कसं आवरलं हे मला माहिती; सरकारला तोडगा काढायचा नाही का?’
- राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- कंगनाचे ‘थलायवी’ चित्रपटाचे प्रमोशन; शेअर केला साऊथ इंडियन लुक

