Share

सोनिया गांधी यांचा हिंदूविरोधी अजेंडा राबवण्यासाठी मुख्यमंत्री झालात का ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अलीकडे साधू हे मनोरुग्ण आहेत, व साधुंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाही; असं धक्कादायक वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी केलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष असणारे आचार्य तुषार भोसले यांच्यावर देखील वडेट्टीवार यांनी टीका केली होती. यामुळे संतप्त झालेल्या तुषार भोसले यांनी मंत्री विजय वडेट्टीवारांवर सडकून टीका केलेली आहे.

“महाविकास आघाडी मध्ये महिलांवर अत्याचार करणारे मंत्री आहेतच पण विजय वडेट्टीवार यांसारखे मनोरुग्ण मंत्री सुध्या आहेत. ठाकरे सरकारमधील मंत्री असणारे वडेट्टीवार ‘साधू मनोरुग्ण आहेत, साधुंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत’ अशा प्रकारच वक्तव्य करतात हे महाराष्ट्रच दुदैव आहे.

तुकाराम महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदू धर्माच्या पवित्र साधू परंपरेवर टीका होते, आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निमुटपणे सत्तेच्या हव्यासापोटी मौन धारण करतात. महाराष्ट्राला हे दिवस दाखवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का ? सोनिया गांधी यांचा हिंदू धर्म विरोधी अजेंडा राबवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात का ?” असा संतप्त सवाल भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!