Share

जाणून घ्या रेल्वेने चीनी कंपन्यांचे कंत्राट सीमेवरील परिस्थितीमुळे खरंच रद्द केले का ?

Published On: 

नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षात 20 हिंदुस्थानी जवान शहीद झाले. आपले 20 जवान शहीद झाले आहेत यावरून अवघ्या देशात संतापाची लाट उसळली आहे. देशातील अनेक भागांत चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. काही भागांमध्ये राजकीय पक्षांनी चिनी मालाची होळीही केली.

यातच रेल्वेशी संबंधित कंपनीनं चीनी कंपन्यांना दिलेलं कंत्राट काल रद्द केलं असल्याच्या वृत्ताची काल मोठी चर्चा होती. मात्र या निर्णयाचा सध्या सीमेवर सुरू असलेल्या निर्णयाशी काहीही संबंध नसल्याचं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी स्पष्ट केलं आहे. या कंपन्यांचा कामगिरी चांगली नव्हती म्हणून त्यांचं कंत्राट रद्द केल्याचं असं ते म्हणाले. पीटीआयनं हे वृत्त दिलं आहे.

केवळ देशातच निर्मिती केलेल्या वस्तूंचा वापर करण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यामुळे आयात केलेल्या वस्तूंचा वापर शून्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. चीनमधील उत्पादकांवर बंदी लादण्याचा रेल्वेचा विचार आहे काय असा प्रश्न विचारल्यावर रेल्वेत निविदा प्रक्रियेत प्रामुख्यानं देशांतर्गंत उत्पादकांना परवानगी दिली जाते असे ते म्हणाले. रेल्वेने तयार केलेली उत्पादनं निर्यात करण्याचाही मानस असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, सध्या बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र आयपीएलला VIVO या चिनी कंपनीची मुख्य स्पॉन्सरशीप असल्यामुळे बीसीसीआयला गेल्या काही दिवसात भारतीय चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे देशातील जनभावनेचा आदर करत बीसीसीआयने चिनी कंपनीसोबतच्या करारावर विचार करण्याची तयारी दाखवली आहे.

दरम्यान, काल भारतीय भूप्रदेशात कोणीही प्रवेश केलेला नाही तसंच भारतीय सैन्याचं कोणतंही ठाणं आपण गमावलेलं नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. भारत चीन सीमेवर उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी, मोदी यांनी काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते.

भारताच्या 20 शूर जवानांनी देशासाठी लडाखमध्ये सर्वोच्च बलिदान दिलं परंतु आपल्या मातृभूमीकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना धडाही शिकवला असं मोदी म्हणाले. देश या जवानांचं शौर्य आणि बलिदान कधीच विसरणार नाही असं सांगून पंतप्रधान म्हणाले की या परिस्थितीवर आवश्यक ते उपाय योजण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य सैन्याला देण्यात आलं आहे आणि चीनला योग्य त्या माध्यमातून भारताची भूमिका स्पष्टपणे सांगण्यात आली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला , तीन भारतीय जवान शहीद

विधानपरिषद निवडणूक : संघटनेतील फुटीवरून स्वभिमानीच्या प्रदेशाध्याक्षांच मोठ विधान…

‘देशातील सर्वात मोठी दहीहंडी यंदा फुटणार नाही’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!